NSS Day 2018 Celebration

NSS Day 2018 Celebration

मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव , पुणे येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन विविध उपक्रमांनी साजरा

 

मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी लोहगांव , येथे दिनांक 26 सप्टेंबर 2018 रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला या मध्ये पोस्टर प्रेझेंटेशन,निबंध स्पर्धा आणि "सकारात्मक जीवनशैली" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . यावेळी आर्ट आॅफ लिविंग च्या श्रीमती शितल पुगांलिया, महाविद्यालयाचे प्राचार्य रुपेश भोरटके,विभाग प्रमुख प्रा.उमेश मोहरील,प्रा. एकनाथ कुर्हे ,प्रा.सुभाष राठोड , कॉर्पोरेट रिलेशन विभाग उपसंचालक प्रा.राहुल जगताप,प्रशासकीय अधिकारी श्री.उदय वानखेडे उपस्थित होते
या उपक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा.रोहित पोलास, समन्वयक प्रा किरण नागरगोजे, प्रा.मनिषा भिसे यांनी केले .
या उपक्रमामध्ये विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले .
या उपक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.भाऊसाहेब जाधव,सचिव श्री.किशोर मुंगळे आणि संकुल संचालक श्री. चारुदत्त बांगळ यांचे मार्गदर्शन लाभले.